देश

आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील

दिसपूर | सरकारने लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केला असला, तरीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही नियमांची सक्ती केलेली आहे. अशात आसाममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

आमदाराच्या वडिलांवर अत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल दहा हजार लोक उपस्थित राहिले. या घटनेनंतर प्रशासनानं तीन गावे सील केली आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यातील आमदाराचे वडील खैरुल इस्लाम यांचं 87 व्या वर्षी निधन झालं आहे.

दोन जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक उपस्थित असल्याची माहिती आहे. ही माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ जवळील तीन गाव सील केली आहेत.

खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक हजर असल्याचं दिसतंय.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल- अनिल परब

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

‘या’ नेत्याची जीभ घसरली, निर्मला सीतारमण यांची केली काळ्या नागिणीशी तुलना

धक्कादायक! पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

100 जणांना वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या