कसोटी क्रिकेटच्या इतिहासात स्मिथने केला ‘हा’ विक्रम

लंडन :  द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 225 धावा केल्या. या डावात स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 145 चेंडूत 80 धावांची खेळी केली.

स्मिथची इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही सलग 10 वी वेळ आहे. त्याने 2017-2019 या कालावधीत इंग्लंडविरुद्ध सलग 10 कसोटी डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

स्मिथने एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सलग 10 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा कसोटी क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

स्मिथने इंग्लंडविरुद्ध मागील 10 कसोटी डावात अनुक्रमे 239, 76, 102*, 83, 144, 142, 92, 211, 82, 80 अशा मिळून 1251 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-