Top News

गुड न्यूज! देशातील ही तीन राज्ये झाली कोरोनामुक्त

नवी दिल्ली | काही राज्यात कोरोना कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मात्र काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यात यश मिळवलं आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही तीन राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं गोवा आधीच कोरोनामुक्त झालं होतं. आता अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. या तिन्ही राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. मात्र आता या राज्यातील कोरोनाच्या सर्व रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात काही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. नागालँड आणि सिक्कीम या राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

देशातील इतर राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांत आतापर्यंत प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

आज राज्यात ७७८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

गुजरातमधील कोरोनासंदर्भात हार्दिक पटेल यांचा धक्कादायक आरोप

जामखेडमध्ये 11 रुग्ण ऐकून माझं मन सुन्न झालं, रात्रभर झोप आली नाही- राम शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या