बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अन् त्याच्यासोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

मुंबई | मुंबईमध्ये टॅक्सीचालक अनेक वेळा भाडे नाकारत असल्याच्या घटना घडत असतात. प्रत्येक मुंबईकरांना या नकाराला कधी ना कधी सामोरं जावं लागतं. अशीच एक घटना दादर मार्केटमध्ये आज घडली आहे. टॅक्सीचालक छबिलाल जैस्वर यांनी दादरमधील एका फळविक्रेत्याचं भाडं नाकारलं.

फळविक्रेता आरोपी बसवराज मेलिणामनी याला टॅक्सी चालकानी भाडं नाकारल्याचा राग आल्याने त्याने छबिलाल यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद हळूहळू पेटत गेला आणि बाजूलाच असलेला पेव्हर ब्लॉक या आरोपीने छबिलाल यांच्या डोक्यात टाकला. या घटनेदरम्यान टॅक्सीचालक छबिलाल यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, दादरच्या गजबजलेल्या कबुतरखाना परिसरात सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी बसवराज याने छबिलाल यांना जवळच जायचं असल्याचं सांगितलं. पण जवळच भाडं असल्याने छबिलाल यांनी भाडं नाकारलं. आरोपी हा त्याच भागामध्ये राहत असल्याने तो टॅक्सी चालकावर दादागिरी करू लागला.

दोघांचा वाद हळूहळू वाढत गेला आणि रागाच्याभरात बसवराज याने जवळचा सिमेंट पेव्हर ब्लॉक उचलून टॅक्सी चालकाच्या डोक्यात घातला आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी बसवराजला अटक केली आहे. दिवसाढवळ्या एका शुल्लक भांडणातून झालेल्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; रिकव्हरी रेट 92.12 टक्यांवर

“महाराष्ट्राच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे”; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य

दिलासादायक! मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

11 हजारांसाठी रुग्णालयाने ठेवून घेतलं महिलेचं मंगळसूत्र; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

पुण्यातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More