बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी कारवाई, गृहमंत्र्यांच्या गावात मोठी छापेमारी

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Valse Patil) यांचे निकटवर्तीय असलेले देवेंद्र शाह (Devendra Shah) यांच्या उद्योगांवर व घरांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. गृहमंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापेमारी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या मंचरमध्ये देवेंद्र शाह यांच्या पराग उद्योग समूहावर आयकर विभागाच्या 4 पथकांनी छापे मारले असून तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पराग व गोवर्धन (Parag & Gowardhan Milk industry) हे दोन उद्योग समूह देशासह संपुर्ण जगभरात पसरले आहेत.

अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्क (Parag Milk) या कंपनीशी व्यवहार आढळून आल्याने ही छापेमारी करण्यात आली असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या छापेमारीनंतर काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परिसरात या छापेमारीमुळे लोकांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

मंचरच्या पराग डेअरीत मध्यरात्री 2 वाजता आयकर विभागाने छापा (Income Tax Raid) टाकला. तसेच देवेंद्र शाह यांच्या घरी सकाळी 7 वाजता छापा मारला. त्यानंतर आतापर्यंत तपासणी सुरूच आहे.

थोडक्यात बातम्या

11 अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्या, सिनेसृष्टीत खळबळ उडवणारा प्रकार

दिल्लीवरुन सूत्रं हलणार, प्रणिती शिंदेंना मिळणार ही’ मोठी जबाबदारी?

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

“…म्हणून मी एक मराठा लाख मराठा घोषणा दिली”, सदावर्तेंचं स्पष्टीकरण

केस कापण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत धक्कादायक प्रकार; एकाला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More