भारत चाम्पियन्स ट्रॉफीत खेळणार, उद्या संघ जाहीर होणार

Champion Trophy
Photo- AP

नवी दिल्ली | चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत सहभागी होणार आहे. नवी दिल्लीत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

महसूल वाटपाच्या मुद्द्यावरुन आयसीसीसोबत बीसीसीआयचा वाद झाला होता. त्यामुळे संघ जाहीर न केल्याने भारताच्या या स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह होतं. अखेर भारताच्या सहभागावर शिक्कामोर्तब झालंय. भारताचा संघ सोमवारी जाहीर केला जाणार आहे. भारताची पहिलीच लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 4 जूनला होणार आहे.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या