बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IND vs SA: भारतीय संघाचा साऊथ आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय

विशाखापट्टणम |  विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांनी भेदक मारा करत आफ्रिकेची चांगलीच दाणादाण उडवली. दुसऱ्या डावात शमीने 5 तर जाडेजाने 4 गडी बाद केले. त्यामुळे आफ्रिकन संघाला अवघ्या 191 धावांवर रोखण्यात भारताला यश आहे.

रोहित शर्माच्या शतकी खेळीने भारताला मजबूत स्थितीत आणले होते. त्यामुळे भारताने आपला दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषीत केला. 395 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली.

सलामीवीर म्हणून रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतकी खेळी केली. रोहितने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More