नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धाचे संपूर्ण जगावर पडसाद पडताना दिसत आहे. अनेकांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या युद्धामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
युद्धाचा 11 वा दिवस असून अद्यापही हल्ले सुरुच आहे. युक्रेनमध्ये दारूगोळ्यांचा पाऊस पडत असताना गगन मोगा यांनी कुटुंबासोबत युद्ध सुरू असलेले शहर सोडले आहे. मात्र युक्रेनच्याच दुसर्या शहरात अडकला आहे. त्यामुळे सध्या कठिण परिस्थिती निर्माण झाली आहे.
गगन मोगाचं युक्रेमध्ये अडकण्याचं कारण त्याचं कुटुंब आहे. गगनची पत्नी युक्रेनची असून ती गरोदर आहे, मात्र भारताच्या निर्वासन ऑपरेशनमध्ये फक्त भारतीयच मायदेशी परतू शकतात. त्यामुळे गगनलाही कुटुंबासमवेत थांबावं लागत आहे.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील विद्यार्थी आणि नागरिक भयभीत झाले आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांचे पालकही खूप चिंतेत आहेत. युद्धाच्या 11 व्या दिवशीही युद्धाचं वारं गडद असल्याचं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“हे सरकार बेवड्यांसाठी पॉलिसी करू शकतं, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही”
धक्कादायक! मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचं संकट, तज्ज्ञांचा गंभीर इशारा
मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर
मोठी बातमी! नवाब मलिकांना ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी
‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा आक्रमक
Comments are closed.