बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“युद्ध झाले तर भारताचा पराभव अटळ”

नवी दिल्ली | सध्या भारत चीन सीमावाद चांगलाच पेटला असल्याचं दिसत आहे. भारत-चीन यांच्यात पूर्व लडाख सीमा वादावरुन काही तोडगा निघताना दिसत नाहीये. त्यामुळे आता याविषयी चीननं भारताला धमकी दिली आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’मधून चीननं भारताला धमकावलं आहे.

दोन्ही बाजूंनी चर्चेच्या 13 व्या फेरीतदेखील कोणतीही सहमती होऊ शकली नाही. उलट उभय पक्षांनी आपापल्या भूमिका आणखी ठामपणे मांडल्या आहेत. त्यामुळे आता तोडगा निघण्याऐवजी वाद आणखी चिघळत चालला आहे. अशातच आता चीननं ‘ग्लोबल टाइम्स’च्या संपादकीय लेखामधून ‘युद्ध झाले तर भारताचा पराभव अटळ आहे’ अशी धमकी दिली आहे.

‘सीमेवर भारताला ज्या पद्धतीनं अतिक्रमण करायचे आहे ते शक्य नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. भारतानं निश्चितच पराभवाला तयार रहावं’ असं त्या लेखात म्हटलं आहे.

दरम्यान, चर्चेमध्ये भारतानं ठेवलेला प्रस्ताव अव्यवहार्य आणि अवास्तव आहे. तो स्वीकारला जाऊ शकत नाही, असं चीननं म्हटलं आहे. अशा प्रकारे चर्चाही होऊ शकतच नसल्याचं चीननं म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

“सत्तेत असून 100 टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं”

विराटनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडूही सोडणार आयपीएलचं कर्णधारपद?

टाटानंतर आता राकेश झुनझुनवालांना मिळाले पंख, वाचा सविस्तर

अजब चोरीची गजब कहाणी! शेतकऱ्याचा 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी केला लंपास

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत गेल्या 24 तासात लक्षणीय घट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More