बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यशस्वी बिझनेसवुमन आणि टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन पद्मभूषण इंदू जैन यांचं निधन

नवी दिल्ली | यशस्वी बिझनेसवुमन, पद्मभूषण आणि टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन इंदू जैन यांचं गुरूवारी निधन झालं आहे. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.  त्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र अखेर 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कला आणि संस्कृतीमध्ये विशेष रस असलेल्या इंदू जैन भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष देखील होत्या. याशिवाय त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी त्यांचं कर्तृत्व मोठं होतं. भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना ‘पद्म भूषण’ या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 2000 मध्ये त्यांनी टाइम्स फाउंडेशनची स्थापना केली होती.

इंदू जैन यांनी वाढत्या वयाची चिंता न करता कायम कामाला महत्त्व दिलं. त्या देशातील यशस्वी बिझनेसवुमन होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू जैन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. समाजासाठी दिलेल्या योगदानासाठी इंदू जैन कायम स्मरणात राहतील, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, फोर्ब्जच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान त्यांनी आपलं स्थान देखील मिळवलं होतं. इंदू जैन या FICCI महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष देखील होत्या.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकार लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार का?, नवाब मलिक म्हणतात…

दुर्दैवी! ‘ही’ गर्भवती डॉक्टर शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना करत होती सतर्क, पाहा व्हिडिओ

“केंद्राने कातडी बचाव धोरण स्विकारु नये”; केंद्र सरकारच्या याचिकेवर टीका

दोन दिवसांपूर्वी रूग्णालयातुन बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा ‘या’ शहरात सापडला मृतदेह

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्रातील ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More