बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐन दिवाळीत महागाईचा भडका! सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता

मुंबई | देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाई कमी होवून नागरिकांना दिलासा मिळणार असं वाटत होतं. पण येणाऱ्या काळात महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र महागाईचाच बोलबाला आहे. परिणामी नागरिकांमधून केंद्र सरकारच्या नावानं बोंबा ठोकल्या जात आहेत. घरगूती गॅसच्या किंमतीत वाढ होवू शकते.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्यानं त्याचा परिणाम गॅसच्या किंमतींवर होत आहे. जागतिक बाजारात गॅसच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. परिणामी देशातील एलपीजी गॅसच्या किंमतीवर 100 रूपये नुकसान होत आहे. घरगुती गॅसच्या किंमती किती वाढवायच्या हे केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात येत असतं. काही दिवसांपूर्वी 15 रूपये प्रति सिलेंडर किंमती वाढवण्यात आल्या होत्या. आता यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

1 जानेवारीपासून आठ महिन्यांत गॅसच्या किंमतीत तब्बल 200 रूपये वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये एका गॅस सिलेंडरची किंमत 694 रूपये होती तो दर वाढून सध्या 884.5 रूपयांवर पोहोचले आहेत. केंद्र सरकार आता दिवाळीपूर्वी किंमती स्थिर ठेवण्यावर भर देत का वाढवतं हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे. सर्वत्र सध्या कोरोनाच्या माहामारीनं नागरिकांना व्यवहारात अडचण आली असताना आता महागाईनं कंबरडं मोडलं आहे.

दरम्यान, तेल कंपन्या दर महिन्याला किंमतीची समिक्षा करत असतात. किंमती वाढवणं किंवा घट करणं या गोष्टींवर भर देण्यात येतो. सध्या वाढत चाललेल्या किंमती पहाता येणाऱ्या सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा मिळणार का ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“अनिल देशमुख कुठं आहेत याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं”

एमपीएससीची मोठी घोषणा! PSI, STI, ASO मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

“त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया होता, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर…”

“महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भगवा फडकवणारच”

दिवाळी सुट्ट्या जाहीर! राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More