बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार; राजस्थानमधील घटनेनं देश हादरला!

कोटा | राजस्थानच्या हाडौतीमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 18 जणांनी बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. कोटा जिल्ह्यातील सुकेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे संपुर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 4 अल्पवयीन मुलांचा आणि एका महिलेचाही सहभाग आहे. सदरील प्रकरणात आरोपींनी मुलीवर 9 दिवस अमानुष अत्याचार केले.

कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असताना ती विव्हळत होती, जिवाच्या आकांतानं ओरडत होती. त्यावेळी तिला शांत करण्यासाठी नराधम अंमली पदार्थ देऊन तिला मारहाण करत होते. पीडित तरुणी मला घरी जाऊ द्या, अशी विनंती नराधमांकडे वारंवार करत होती. मात्र, तिला चाकू दाखवून गप्प करण्यात आलं.

ही घटना 25 फेब्रुवारी 2021 रोजी घडली आहे. ‘आरोपी चौथमल आणि बुलबुल उर्फ पूजा जैन हे दोघे अल्पवयीन मुलीला बॅग देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून शेजारच्या झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. त्यांनी तिथे तीन-चार मुलांना बोलावलं आणि पीडितेला त्यांच्याकडे सोपवलं. तिला पहिल्या दिवशी गागरोन किल्ल्यावर नेण्यात आलं. त्यानंतर झालावाडमधील एका खोलीत नेऊन तिथे तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले,’ अशी माहिती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरींनी दिली आहे.

दरम्यान, पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, झालावाड आणि गागरोनमधील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला. 5 मार्चला आरोपी महिला बुलबुल उर्फ पूजा जैन हिने अल्पवयीन पीडितेला झालावाडमधल्या सुकेतमध्ये आणून सोडलं. त्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला आणि 6 मार्चला पोलीस ठाण्यात जाऊन तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनीही या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई केली आहे.

थोडक्यात बातम्या

चाहत्यानं दिलेलं गिफ्ट पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पाहा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण!

पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाताना 18 वर्षीय तरुणी ग्रीलमध्ये अडकली अन्…, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More