Top News आरोग्य कोरोना खेळ

IPL2020- कोरोनावर मात करत ऋतुराज गायकवाड परतला सरावासाठी

दुबई | आयपीएलचा थरार सुरु झाला आहे. उद्या आयपीएलचा चौथा चौथा सामना असून हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये खेळवला जाणार आहे. तर चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाड सरावासाठी परतला आहे.

23 वर्षाचा महाराष्ट्राच्या या ऋतुराजला चेन्नईच्या संघात स्थान मिळालं आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापूर्वीच ऋतुराजला कोरोनाची लागण झाली होती. यासाठी तो दोन आठवडे क्वारंटाईलमध्येही होता. मात्र आता कोरोनावर मात करून ऋतुराज सरावासाठी परतला आहे. चेन्नईच्या ट्विटरवरून त्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचे 13 सदस्य गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचा समावेश होता.

दिपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. दिपकने कोरोनावर मात केली. मात्र ऋतुराजला यातून सावरण्यास थोडा वेळ लागला. मात्र आता कोरोनावर मात करत तो सरावासाठी परतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठा समाज आक्रमक; आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरात आंदोलक रस्त्यावर

मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जिओ मोठा करार करण्याच्या तयारीत

“पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या