बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीरसिंग यांचा धक्कादायक खुलासा; मेल आयडीबद्दल म्हणाले…

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी लिहिलेल्या धक्कादायक पत्रावर शंका उपस्थित केली जात होती. या पत्रावर त्यांची सही नसल्याचा तसेच त्यांच्या अधिकृत मेल आयडीवरुन हा मेल आला नसल्याचा दावा केला जात होता. मात्र आता या प्रकरणात स्वतः परमबीर सिंग यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

ज्या मेल आयडीवरुन मुख्यमंत्री तसेच राज्यपालांना पत्र लिहिण्यात आलं तो मेल आयडी माझा स्वतःचं असल्याचं परमबीरसिंग यांनी सांगितलं आहे. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने परमबीरसिंग यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला यावेळी त्यांनी मेल आयडी आपलाच असल्याचं आणि पत्र स्वतःच लिहिल्याचं सांगितलं आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणात एनआयएने अटक केलेले एपीआय सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या पत्रावर शंका उपस्थित केली जात होती, मात्र आता स्वतः परमबीरसिंग यांनी हे पत्र खरं असल्याचं सांगितल्यानं गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीरसिंग यांचे आरोप फेटाळून लावले आहेत, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, मात्र असं असलं तरी देशमुखांची खुर्ची धोक्यात असल्याचं दिसत आहे. या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, असं जाणकारांचं मत आहे.

थोडक्यात बातम्या-

एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं लक्ष्य मग अख्ख्या राज्य सरकारसमोरील लक्ष्य किती असेल- पूनम महाजन

“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

‘…तर आदरणीय पवारजींना जाब विचारायला हवा’; काँग्रेस नेत्याचा शरद पवारांवर निशाणा

सरकारमधील प्रत्येकानं आपले पाय जमिनीवर आहेत का पाहावं- संजय राऊत

‘…म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा होता’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More