बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती, आता काँग्रेसमधली विचारांची परंपरा संपत चाललीये”

इंदापूर | गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झालेले दिसत आहेत. काँग्रेसमध्ये सध्या तरूण नेत्याचं नेतृत्व उभं राहत आहे. एकेकाळी भाजपवर कडाडणारी तोफ म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची ओळख होती. तर स्वतःच्या पक्षातील चूका ते खुलेआम सांगतात. आता असचं एक वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.

काँग्रेसमध्ये आधी माझ्या शब्दाला किंमत होती. आता आहे की नाही माहित नाही, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसच्या विचारांची परंपरा संपत चालली आहे. सध्या कुठेही शिबिरं घेण्यात येत नाहीत. त्या शिबीरांमधून आपण कुठे आहोत हे पाहता येत होतं. आता आम्ही कुठे आहोत, आत्मचिंतन कसं करायचं ते कळणं कठीण झालं आहे. अनेक धोरणं आहेत चुकीची असतील पण ती सुधारण्यासाठी चिंतन शिबीराची परंपरा होती, ती आता दिसत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे हे इंदापूरमध्ये आले होते. त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी रत्नाकर महाजन यांना राज्यसभेवर पाठवण्यात यावं अशी मागणी केली गेली. त्यावर बोलताना त्यांनी काँग्रेसच्या वैचारिक परंपरेविषयी खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोरोना काळाआधी देशातील आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. देशात बेबंदशाहीची स्थिती येईल. गरीब माणसाला येथे जगणे कठिण झाले आहे. आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, त्यामुळे नव्या सुशिक्षित तरुणांना काही वाव राहिलेला नाही. त्यामुळे देशातील विस्कटलेल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामं करता का?’; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘हे’ नवीन नाव चर्चेत

‘4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास…’; स्टेट बॅंकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

‘…सरकार शहाणं झालं म्हणा’; ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारचं कौतुक अन् टोमणे एकाचवेळी

“आम्ही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केलंय, आताची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More