दारुच्या नशेत जॅकी श्रॉफची तब्बूवर जबरदस्ती, बहिणीनं केला खुलासा!

तब्बू… अर्थात तब्बूसुम हाश्मी… तिचं हे नाव किती जणांना माहीत आहे, हा प्रश्नच आहे. कारण ती प्रसिद्ध झाली ‘तब्बू’ या एकाच नावानं… ४ नोव्हेंबर हा तब्बूच्या आयुष्यातला खास दिवस… कारण याच दिवशी असतो तिचा वाढदिवस… महिलांना वय विचारायचं नसतं असं म्हणतात, मात्र अभिनेते-अभिनेत्रींचं आयुष्य एखाद्या ‘खुली किताब’ प्रमाणे असतं. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसापासून तर त्यांच्या अफेअर्सपर्यंत सगळ्या गोष्टींच्या खुलेपणानं चर्चा होतात. अशा चर्चांमध्ये अभिनेत्रींचं वय थोडीच झाकून राहील… तब्बूही त्याला अपवाद नाही त्यामुळे ती ४६ वर्षांची होतेय याची जवळपास सगळ्यांनाच कल्पना आहे.

तब्बूचा जन्म १९७१ सालचा… हैदराबादच्या रिजवाना आणि जमाल हाश्मी यांच्या घरी तब्बूचा जन्म झाला. हैदराबादच्या सेंट एन्स विद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर तब्बूने मुंबईचा रस्ता पकडला. मुंबईच्या सेंट झेवियर्स विद्यालयात तीने तिचं पुढचं शिक्षण घेतलं आणि पुढे चंदरी दुनियेत पाऊल ठेवलं. 

नशे में तब्बू से जबरदस्ती करने लगे थे जैकी श्राफ, बहन ने किया था खुलासा

प्रत्येक अभिनेते-अभिनेत्रीच्या सगळ्याच गोष्टी जगासमोर येतात, असं नाही. काळी गोष्टी काळाच्या पडद्यासोबत त्यांच्याबरोबर निघून जातात. मात्र तब्बूच्या आयुष्यात घडलेली अशीच एक घटना आता समोर आलीय. ही गोष्टी जेव्हा घडली तेव्हा जर बाहेर आली असती तर कदाचित अभिनेता जॉकी श्रॉफचं करिअर त्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकलं असतं. 

नशे में तब्बू से जबरदस्ती करने लगे थे जैकी श्राफ, बहन ने किया था खुलासा

गोष्ट आहे १९८६ सालची… तब्बूची मोठी बहिण फराह अभिनेता जॅकी श्रॉफसोबत ‘दिलजमा’ सिनेमाचं शुटिंग करत होते. तब्बू आपल्या बहिनीसोबत या सिनेमाच्या सेटवर जात असे. याच सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या डॅनीनं एका दिवशी पार्टीचं आयोजन केलं होतं. तब्बू आपल्या बहिणीसोबत या पार्टीत पोहोचली. मात्र यावेळी तिच्यावर एक प्रसंग गुदरला. दारुच्या नशेत असलेल्या जॅकी श्रॉफनं तब्बूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

नशे में तब्बू से जबरदस्ती करने लगे थे जैकी श्राफ, बहन ने किया था खुलासा

डॅनी मदतीला धावला नसता तर जॅकीला आवरणं कठीण गेलं असतं, असं फराहनं एका मुलाखतीत सांगितलं. एवढा मोठा प्रसंग उद्भवूनही तब्बूनं कुठेही या प्रकाराची वाच्यता केली नाही. जॅकीचं करिअर तेव्हा चांगलं सुरु होतं. तब्बूनं या प्रकाराची वाच्यता केली असती तर कदाचित तिला सहानुभूती मिळाली असती आणि जॅकीचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं. मात्र केवळ स्वतःचा फायदा करुन घेण्यासाठी तब्बूनं या घटनेचा कधीच वापर केला नाही. 

तब्बूच्या फिल्मी करिअरची सुरुवात तशी अगदी वयाच्या १५ व्या वर्षीच झाली. १९८५ साली आलेल्या हम नौजवान सिनेमात तिने देव आनंदच्या मुलीची भूमिका केली. प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसायला तिला १९९४ साल उजाडावं लागलं. सिनेमा होता ‘पहला पहला प्यार’.

नशे में तब्बू से जबरदस्ती करने लगे थे जैकी श्राफ, बहन ने किया था खुलासा

अभिनेता अजय देवगणच्या दृश्यम सिनेमातील तिच्या पोलिसाच्या भूमिकेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. मधल्या काळात चंदेरी पडद्यापासून दूर असलेल्या तब्बूला आणखी चांगले सिनेमे मिळाले. नुकत्याच आलेल्या गोलमाल अगेनमध्येही तब्बू झळकली. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक होतंय. 

नशे में तब्बू से जबरदस्ती करने लगे थे जैकी श्राफ, बहन ने किया था खुलासा

आपल्या २ दशकांच्या फिल्मी कारकीर्दीत तब्बूनं ४० सिनेमांमध्ये काम केलं. सिनेमे निवडण्यात तशी ती खूपच चोखंदळ ठरली. अनेक अभिनेत्यांसोबत तिने काम केलं मात्र जॅकी श्रॉफसोबत मात्र ती कधीच दिसली नाही.