मुंबई | भारत आणि इंग्लंडमधील चालू झालेला पहिला कसोटी सामना भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहसाठी खास आहे. बुमराह आपल्या देशात पहिला कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे हा सामना त्यासाठी विशेष आहे.
सलामीला आलेल्या रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ले यामधील आर. आश्विनने बर्न्सला बाद केल्यानंतर डॅरेन लॉरेन्स फलंदाजीला आला होता. तेव्हा जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा फलंदाज डॅरेन लॉरेन्सला तंबूत धाडलं. त्याला एक षटकही खेळी दिलं नाही. षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो बाद झाला.
बाद झाल्यानंर लॉरेन्सला विश्वास बसला नाही. त्यानंतर त्याला डीआरएसनुसार रिव्ह्यु घेता आला असता. मात्र त्याने आपल्या सहकाऱ्यासोबत चर्चा केली आणि तो माघारी परतला.
दरम्यान, नवखा फलंदाज असलेल्या लॉरेन्सला बाद करत बुमराहने आपली मायदेशातील पहिली विकेट घेतली.
A beautiful delivery by Jasprit Bumrah to take his first test wicket on home soil. #TeamIndia #INDvENG #WTC21 #Bumrah @BCCI @Jaspritbumrah93 @GCAMotera pic.twitter.com/shXXiDuNar
— Dhanraj Nathwani (@DhanrajNathwani) February 5, 2021
थोडक्यात बातम्या-
आर. आर. पाटलांच्या पोलिस बंधूंचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार; अजित पवार भावूक, म्हणाले…
काँग्रेस हायकमांडने प्रणिती शिंदेंवर सोपवली ‘ही’ नवीन जबाबदारी
‘मराठ्यांसह ‘यांनाही’ आरक्षण द्या’; रामदास आठवलेंची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड!
‘राज्यपालांनी आता अंत पाहू नये’; अजित पवार संतापले