बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शहीद जवानाला अवघ्या 1 वर्षाच्या लेकीने दिला मुखाग्नी; संपूर्ण देश हळहळला

नारायणपूर | छत्तीसगडच्या नारायणपूर इथं नक्षलवादी हल्ल्यात मंगळवारी 5 जवान शहीद झाले. त्यांचे शव बुधवारी त्यांच्या जन्मगावी नेण्यात आले. यावेळी 1 वर्षाच्या चिमुरडीने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. यावेळी सर्वांचेच डोळे भरून आले. जवानांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फूटला.

जवानांना कुमारपारा इथल्या रक्षित केंद्रात श्रद्धांजली दिली गेली. यादरम्यान बस्तर आयजी, PCC चीफ मोहन मरकाम आणि आमदार चंदन कश्यप उपस्थित होते. मृतदेह घेऊन जाण्याच्या दरम्यान PCC चीफ मोहन मरकाम यांनी खांदा दिला.

जिल्ह्यापासून जवळ 40 किलोमीटर दूर कडेनार इथं मंगळवारी नक्षलवाद्यांनी IED चा स्फोट घडवला. डीआरजी जवानांची बस यात नक्षलवाद्यांनी उडवली. हा स्फोट इतका मोठा होता, की ही बस 30 फूट वर उडाली. हायटेंशन तारेला स्पर्श करून ती खाली पडली. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. 12 जवान घायाळ झाले. यातील तिघांची अवस्था गंभीर आहे. त्यांच्यासोबत 7 जवानांना रायपूरला रेफर केलं गेलं आहे.

दरम्यान, बस्तरच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी तोंड वर काढलं आहे. सतत हल्ले होत आहेत आणि पोलिसांच्या मदतीला गेल्याचा संशय घेत सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या जात असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पीछे हटो पीछे…’; दीप प्रज्वलन करताना फोटोसाठी पुढे आलेल्या बाबूल सुप्रियोंवर अमित शहा भडकले, पाहा व्हिडीओ

“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल!

‘…तर तो सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे’; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

मोठी बातमी! महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More