जिओच्या साम्राज्याला धक्का?; गुगलचा स्वस्तातला फोन बाजारात दाखल

टेक डेस्क |जगातील प्रसिद्ध असे सर्च इंजिन म्हणून नावाजलेली कंपनी गुगलने केवळ 500 रुपयांमध्ये 4G फोन WizPhone WP006 लाँच केला आहे. हा फोन JioPhone ला टक्कर देणार असल्याची चर्चा बाजारात रंगली आहे.

या फोनचा बराचसा भाग JioPhone शी मिळता जुळता आहे. या फोनमध्ये गुगल असिस्टंट पण देण्यात आले आहे. या फोनचा डिस्प्ले हा 2.4 इंचीचा देण्यात आलेला आहे.

या फोनमध्ये 4 GB इंटरनल स्टोरेजसह 512 MB रॅम देण्यात आली आहे. हा फोन KaiOS या सिस्टिमवर चालतो.

काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये? –

– 1800 MAH बॅटरी
– 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
– सेल्फीसाठी VGA कॅमेरा
– सिंगल सिम सपोर्ट
– 2.4 इंच QWVGA डिस्प्ले
–  पिक्सेल रिझोल्यूशन 240*320
– 1.2गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर
– 512 MB रॅम 
– माली-400 जीपीयु इंटिग्रेडेट (खास ग्राफिक्ससाठी)
– 4 GB  इंटरनल मेमरी (मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 128 GBपर्यंत वाढवता येणार)
– बेसिक फोटोग्राफीसाठी 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
– फ्रंट पॅनलवर VGA कॅमेरा

महत्वाच्या बातम्या 

-नरेंद्र मोदींनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत – राहुल गांधी

-RBI च्या नव्या गव्हर्नरनी केलं होत नरेंद्र मोदींच्या या सर्वात मोठ्या निर्णयाचं समर्थन

-कोण आहेत शक्तिकांत दास?

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे