मुंबई | गणेश नाईक यांच्यावर शरद पवारांचा प्रचंड विश्वास होता पण नाईक यांनी त्यांना धोका दिला. ही जखम पवार यांच्या हृदयावर आजही आहे. त्यामुळे ही जखम भरून काढण्याचे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावं, असं आवाहन गृहनिर्माणमंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
मीरा-भाईंदरचे नगरसेवक ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले तेव्हाच मी गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार असल्याचं ओळखलं होतं आणि याबाबत शरद पवारांनीही कल्पना दिली असल्याचं आव्हाडांनी सांगितलं. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.
पूर्वीच्या काळात गणेश नाईक यांना राजकारणात आदराचं स्थान होतं. मात्र भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना साधी बसायलाही खुर्ची मिळाली नाही, अशी टीकाही आव्हाडांनी केली.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी मोदी आणि अमित शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, असे गणेश नाईक म्हणायचे. पण हेच तिकडे पळाले, असं म्हणत आव्हाडांनी नाईकांवर निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
‘2019 च्या सत्तास्थापनेची अजित पवारांशी नाही तर….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट
“देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही?- प्रकाश आंबेडक
शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा
“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”