बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जितेंद्र आव्हाडांचं भिवंडीत जोरदार स्वागत, कोरोनाला चिरडून मारण्यासाठी मोठी गर्दी!

मुंबई | काही दिवसांपूर्वी कोरोना रूग्णसंख्या कमी होताना दिसत होती. मात्र, सध्या राज्यात कोरोना रूग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय कार्यक्रम आणि सभा न घेण्याचं आवाहन करताना दिसतात. मात्र, त्यांच्याच सरकारमधील मंत्री खुलेआम सरकार घालून दिलेले नियम पायदळी तुडवताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी भिवंडीला भेट दिली. शेकडोच्या संख्येने दुचाकी गाड्या आणि चारचाकी गाड्या घेऊन आव्हाड भिवंडीत पोहचले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी भिवंडीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्याचा एक व्हिडीओ त्यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भिवंडीत रोड शो केल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे त्या परिसरात मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. एकीकडे कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना सरकारमधील मंत्री रॅली कशी काय काढू शकतात? असा सवाल आता नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड भिवंडीत आल्यानंतर वाहतूक व्यवस्था खोळंबली. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या संकंटाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे नेत्यांनी आणि मंत्र्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर कडाडून टीका करताना दिसले होते. तर अजित पवारांनी देखील रॅली, मोर्चे आणि आंदोलन न करण्याचं आवाहन केलं होतं. पंरतु, आता स्वत:च्या पक्षातील मंत्र्याने घोडचूक केल्यानं राष्ट्रवादी यावर कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

नेटकऱ्यांचा खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी वाहिली ‘या’ सुपरस्टरला श्रद्धांजली

मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कोणाला? वाचा निवडणुकीपूर्वी लोकांचं मत काय

राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पुण्यात तब्बल 91 गावं कोरोनाची हाॅटस्पाॅट; ‘या’ तीन तालुक्यांना मोठा धोका

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नाट्यगृहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More