बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कुठून हे नग मिळतात?’; ‘या’ भाजप नेत्यावर जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

मुंबई | कोरोनाचा विळखा राज्यातच नव्हे तर देशभर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. तसेच देशात अनेक ठिकाणी लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये. अनेकांना बेडसाठी वणवण फिरावं लागतंय. तर अनेकांचा बेड आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. मात्र या संकटाच्या काळात अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. आता उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक अजब वक्तव्य केलंय.

कोरोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आपण स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. मात्र त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवतोय, असं वादग्रस्त वक्तव्य उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलंय.

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. तसेच त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त, 53 हजारांपेक्षा रूग्ण परतले घरी

‘या’ राज्यात लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारने आणखी लॉकडाऊन वाढवला

“खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना मोदी नॉन परफॉर्मिंग असेट वाटणं स्वाभाविक”

खरं का काय! कोंबडा बोलू लागला अल्लाह ,अल्लाह; पाहा तुफान व्हायरल व्हिडीओ

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More