Top News विधानसभा निवडणूक 2019

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं आणि राज्याला स्थिर सरकार द्यावं- जोगेंद्र कवाडे

मुंबई |  दिल्लीशी टक्कर देणाऱ्या शिवसेनेचं कौतुकच झालं पाहिजे. म्हणून भाजपच्या जोखडातून मुक्त झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं आणि राज्याला स्थिर सरकार द्यावं, असं दलित नेते आणि पीपल्स रिपब्लिन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या पुढे न झुकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हिमतीचे कौतुकच केले पाहिजे. कारण जे उद्धव यांनी केलं ते एवढं सोपं नव्हतं. केंद्रिय मंत्री अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यातून सेनेने आपला करारी बाणा दाखवून दिला, असं कवाडे म्हणाले.

शिवसेना भाजपपासून दूर झाली हे बरं झालं. आता त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चांगलं सरकार बनवावं आणि या राज्याला स्थिर सरकार द्यावं. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने राज्याला परिवर्तनवादी सरकार मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी असला तरी आता महाराष्ट्रवादी आहे. वैचारिक परिवर्तनातूनच सरकार येते त्यामुळे शिवसेना सोबत आली तर 5 वर्ष सरकार देणं शक्य आहे. घटक पक्ष म्हणून आम्हालाही सत्तेचा वाटा मिळायला हवा, असंही कवाडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या