बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”

नवी दिल्ली | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यानंतर लोकसभेतही याचे पडसाद उमटले. या मुद्द्यावरून खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार 100 कोटींची खंडणी वसुली करत असल्याच्या बातम्या येत आहेत. हे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ही वसुली करत आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आधी हिशेब द्यावा, असं ज्योतिरादित्य शिंदेंनी म्हटलं आहे.

मला तोंड उघडायला लावू नका. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला गेला. पण किमतीत जी वाढ झाली आहे. त्यात वाटा कोणा-कोणाचा आहे. पेट्रोल-डिझेवरील खर्च सोडता त्यावरील 40 टक्के कर हा राज्यांना मिळतो तर 60 टक्के वाटा केंद्राला मिळतो. पण वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्राच्या वाट्यातील 42 टक्के भाग हा राज्यांना दिला जातो, असं सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

दरम्यान, ‘पेट्रोल-डिझेलवरील कराचा 64 टक्के वाटा हा राज्यांना मिळतो. मग राज्य सरकार दर कमी का करत नाही? महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. यामुळे ‘जिनके घर शीशे के हो वह दुसरों पर पत्थर नहीं फेंका करते’, असा टोला देखील ज्योतिरादित्य शिंदे यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल!

‘…तर तो सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे’; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

मोठी बातमी! महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट

मुख्यमंत्र्यांनी ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं- अनिल देशमुख

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत पुणे महापालिकेेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More