बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगणाने केलं पाकिस्तानचं कौतुक, नेटकऱ्यांचा पारा चढला

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. असंच एक वादग्रस्त वक्तव्य कंगणाने केलं आहे. मात्र आता तिने तिच्या ट्विटवरुन पाकिस्तानची स्तुती केली आहे. या कारणामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कंगणाने केलेल्या ट्विटनुसार पाकिस्तानमध्ये चाललेल्या टाॅप ट्रेंडला पाहून खूप छान वाटलं असल्याचं कंगणाने म्हटलं आहे. संबंधित हॅशटॅग हे #pakistanstandswithindia असं आहे. तसेच भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो,  असं कंगणाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंगणाच्या या ट्विटनंतर देशभरातल्या अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. या दरम्यान तुझं डोकं ठिकाणावर आहे का? चर्चेत राहण्यासाठी आता तू काहीही ट्विट करु लागली आहेस का? मोदींच्या नजरेत येण्यासाठी ही बाई आता काहीही ट्विट करतेय, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या या मदतीवर भारताने अद्याप कोणताही निर्णय दिला नसला तरीही अनेकजन याचं कौतुक करत आहेत. यातच कंगनाने देखील हा ट्रेंड पाहून पाकिस्तानची स्तुती केली आहे. कंगणा लवकरच ‘थलायवी, धाकड, तेजस’, या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा- राहुल गांधी

प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे, घाबरून जाऊ नका- नरेंद्र मोदी

‘वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत’; ‘या’ आमदाराने रेमडेसिविरसाठी 90 लाखांची FD मोडली

‘मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये’; त्या व्हायरल मेसेजवर सरकारने दिलं स्पष्टीकरण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More