बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जर काँग्रेस वाचली नाही तर….’; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैया कुमार गरजला

नवी दिल्ली | आगामी काही काळात अनेक राज्यात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे देशातील अनेक राजकीय पक्ष या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहेत. काॅंग्रेस पक्ष आगामी निवडणुकांसाठी तरूणांना संधी देणार असल्याचं बोलण्यात येत होतं. कम्युनिस्ट नेता आणि जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी आज खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलं आहे. त्यावेळी कन्हैया कुमारने नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

जर काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही, असं फक्त मलाच नाही तर देशातल्या सर्व तरुणांना वाटू लागलं आहे. आज जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षप्रवेशाचा अर्ज भरत होतो. तेव्हा जिग्नेश यांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि मी त्यांना भगतसिंग, गांधी आणि आंबेडकरांची प्रतिमा दिली. कारण आज या देशाला आंबेडकरांच्या समानतेची, भगतसिंगांच्या शूरतेची आणि गांधीच्या एकतेची गरज आहे. आज पंतप्रधान फक्त नावाला आहेत, देशाला फक्त काँग्रेसच वाचवू शकते, असं मत कन्हैया कुमारनी व्यक्त केलं आहे.

कन्हैया कुमारबरोबर गुजरातचा आमदार जिग्नेश मेवाणी सुद्धा काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आज या देशात भारतीय होण्याची जी ओळख आहे, ज्यात सत्तेला आव्हान देण्याचं सामर्थ्य आहे. त्या भारतीय चिंतन परंपरेला वाचवण्याची आज गरज आहे. म्हणून मी काँग्रेसमध्ये सामील झालो आहे. कारण हाच तो पक्ष आहे जो महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, आंबेडकर, नेहरु, भगतसिंग यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, असं कन्हैया कुमार म्हणाला.

समानता आणि समता ही कोणा एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तो भारताचा इतिहास आहे. आणि भारताच्या या इतिहासाला काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्यात सामावून घेतलं आहे. त्यामुळे मला असं लक्षात येत आहे की देशात भाजपासमोर इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेस या सर्वात जुन्हा पक्षाला वाचवलं नाही, मोठ्या जहाजाला वाचवलं नाही, तर इतर छोटी जहाजंही बुडून जातील, असंही कन्हैया कुमारने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

21 कोटींची बोली लागलेल्या सुलतानने घेतला अखेरचा श्वास! मालक ‘बनीवाल’ करत होता तब्बल ‘इतका’ खर्च

दिल्लीचा विजयरथ अखेर कोलकाताने रोखला! कोलकाताचा दिल्लीवर धमाकेदार विजय

“जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत”

“पुढची दहा वर्षे धनंजय मुंडेंना कोणीच हरवू शकणार नाही”

“शेतात गुडघाभर पाणी आहे, नुकसान फक्त टक्केवारीत मोजू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More