बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत करण जोहर झाला भावूक, म्हणाला…

मुंबई | 2 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध कलाकार तसेच ‘बिग बाॅस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदय विकाराच्या झटक्याने अकाली निधन झालं. या घटनेनंतर  त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची एक चाहती कोमात गेली असल्याचं देखील समोर आलं आहे. अशातच ओटीटी प्लॅटफाॅर्मवर सुरु असलेल्या बिग बाॅस ओटीटीमध्ये सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

वूट प्लॅफाॅर्मवर ‘बिग बाॅस 15’ शो सुरु आहे. ‘संडे का वार’ मध्ये करण जोहरने नेहमीप्रमाणे उपस्थिती लावली होती. मात्र दरवेळेस स्पर्धकांचा क्लास घेणारा करण ‘संडे का वार’मध्ये निशब्द होता. यावेळी त्याने सिद्धार्थ कर्लस चॅनेलचा तसेच बिग बाॅस टीमचा महत्त्वाचा भाग होता, असं करणने म्हटलं आहे.

करणला आपण ‘झलक दिखला जा’ पासून ओळखत असल्याचं करणने म्हटलंय. शोदरम्यान करणने शो मस्ट गो ऑन, असं म्हणत सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आणि शो पुढे सुरु केला. सिद्धार्थने करणच्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. एवढंच काय तर दोन आठवड्यांपुर्वीच सिद्धार्थ आणि शहनाजने बिग बाॅस ओटीटीवर उपस्थिती लावली होती. यावेळी करणने दोघांसोबत खूप मज्जा केली होती.

दरम्यान, आपल्या जवळचा मित्र गमावल्याचं दुःख करणच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकून दिसत होतं. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना निशब्द केलं असल्याचं देखील म्हटलं आहे. सिद्धार्थची मैत्रिण अर्थात सर्वांची आवडती अभिनेत्री शहनाज गिल हिला देखील सिद्धार्थच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

“सत्तेत असल्यावर महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का?”

‘लस घेतल्यानंतर 20 दिवसांनी ही लक्षणं दिसली तर…’; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

“पती-पत्नीपेक्षाही त्यांचं नातं गहिरं होतं, शहनाजची स्थिती पाहून मी थरथर कापत होतो”

मी काय आहे काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा- चित्रा वाघ

नोकरी मिळवण्यासाठी पठ्ठ्याची भन्नाट कल्पना; केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More