महाराष्ट्र मुंबई

‘पोलिसांनी मला सहकार्य न केल्यास…’; करूणा शर्मा यांनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे मला माझ्या मुलांशी भेटू देत नसल्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. तसेच मुंडे यांनी चित्रकूट बंगल्यावर माझ्या दोन्ही मुलांना डांबून ठेवलं असल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलं आहे.

जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही आणि पोलिसांनी मला सहकार्य केलं नाही तर मी 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यासाठी मला मंत्रालय किवा चित्रकूट बंगल्यावर उपोषणासाठी परवानगी द्या, अशी विनंती करूणा शर्मा यांनी केली आहे.

माझ्या मुलांसोबत काही बरं वाईट झाल्यास त्याला धनंजय मुंडे जबाबदार असणार आहेत, असंही करूणा शर्मांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मा; नव्या आरोपांनी धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

‘या’ तारखेपासून महाविद्यालये पुन्हा सुरु होणार; उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा

शरजील उस्मानी कुठेही असला तरी त्याला शोधून अटक करू- अनिल देशमुख

गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने शिक्षकाला दिला निरोप, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या