बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

मुंबई | राणा दांपत्याच्या भेटीला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) खार पोलीस ठाण्याबाहेरच शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं.

सोमय्यांवर खार पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप (BJP) आक्रमक झालं आहे. सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना किरीट सोमय्यांनी या हल्लाप्रकरणी आता उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. किरीट सोमय्यांनी या हल्ल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

23 एप्रिल रोजी झालेल्या हल्ला प्रकरणी सोमय्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. या हल्ल्यात मुंबई पोलिसांनी बनावट आणि फेरफार करून दाखल केलेल्या एफआयआरची सीबीआयमार्फत (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्यांनी या याचिकेतून केली आहे.

दरम्यान, आपल्यावरील हल्ला हा किरकोळ घटना असल्याचा उल्लेख केला असून सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या गुंडाचे संरक्षण करण्याच्या हेतुने एफआयआरमध्ये फेरफार करण्यात आला असल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. तर गुरूवारी ही याचिका दाखल करण्यात आली असून पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

काहिली वाढणार काळजी घ्या! IMD कडून ‘या’ पाच राज्यांना अलर्ट जारी

बच्चू कडूंना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

‘ये भोगी’ म्हणत अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; दरमहा ‘इतके’ हजार मिळणार

“मी कधीच आई होऊ शकत नाही”, भर कार्यक्रमात अभिनेत्री ढसाढसा रडली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More