मुंबई | ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांच्यावर तिखट शब्दात टीका केल्यानंतर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना मोठा विरोध सहन करावा लागत आहे. काहींनी त्यांच्यावर अश्लील शब्दात अत्यंत खालच्या पातळीची टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी या टीकाकारांना खडेबोल सुनावले आहेत.
मला अभिमान आहे की मी भारताची नागरिक आहे. जिथं स्त्रीला देवीसमान मानलं जातं आणि देवीची पुजा केली जाते. लहान मुलींपासून मोठ्या स्त्रीयांशी आपण आदरानं वागतो. पण एखादी स्त्री चुकीचं वागत आहे किंवा तिचं कार्य चुकीचं आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण तिच्यावर अश्लील टीका करतो हे योग्य नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
माझं म्हणणं एवढंच आहे की टीका करायची असेल तर तिच्या विचारांवर टीका करा, पण ती सभ्य भाषेत करा. विचारांचा मतभेद आहे त्यासाठी अश्लील भाषा वापरणं याचा मी निषेध करते. तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या ज्या गोष्टी करतात त्या कुणाला आवडतील, कुणाला आवडणार नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यावर अश्लील भाषेत टीका कराल, असं म्हणत शहाणे यांनी टीकाकारांना सुनावलं आहे.
सभ्यतेनेही तुम्ही त्या विचारांचा विरोध करु शकता. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही सभ्य भाषेत सुद्धा सांगू शकता. टीका करा पण विचारांनी विचारांची टीका करा, अशी विनंती शहाणे यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
सध्या माझे वाईट दिवस सुरु आहेत- इंदुरीकर महाराज
“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”
महत्वाच्या बातम्या-
आगीची माहिती मिळताच अजितदादा घटनास्थळी; स्वत: दिल्या सूचना
वारकरी संप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकर प्रकरणावरून भाजपचा गंभीर आरोप
“सत्ता गमवल्याच्या झटक्यातून फडणवीस आणखी बाहेर आले नाहीत”
Comments are closed.