बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

SBI च्या ‘या’ भन्नाट योजनेत पैसे गुंतवा आणि मालामाल व्हा, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | येत्या काळात जर तुम्ही गुंतवणुक करण्याच्या विचारात असाल तर SBI बँकेची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. SBIची ही अशी योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळणार आहे. तुम्ही SBIच्या अॅन्युइटी डिपॉझिट या स्कीममध्ये नोंदणी करू शकता. या योजनेत एकरकमी रक्कम भरल्यास तुम्हाला महिन्यासाठी निश्चित EMI मिळणार आहे.

या योजनेत गुंतवणूकदाराला एकरकमी रक्कम भरावी लागते आणि त्यानंतर समान रक्कम मासिक हफ्त्यांमध्ये अर्थात EMIमध्ये मिळवावी लागते. या योजनेत मूळ रकमेचा आणि त्यावरील व्याजाचाही समावेश असून व्याजाची गणना ही तिमाही आधारावर केली जाणार असल्याची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

या रकमेच्या ठेवीचा कालावधी 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांचा असून ही योजना SBIच्या सर्वच शाखांमध्ये उपलब्ध आहे. ठेवीची रक्कम संबंधित कालावधीसाठी किमान 1000 रूपये वार्षिक आधारित आहे. जर ठेवीदाराचा मृत्यू झाला तर कोणत्याही मर्यादेशिवाय अकाली पेमेंट करण्यात येते. पण या योजनेत नामांकन सुविधा ही केवळ वैयक्तिक व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.

या योजनेत ठेवीच्या महिन्यानंतर महिन्याच्या त्याच तारखेला अॅन्युइटी दिली जाते. जर ती तारीख त्या महिन्यात अस्तित्वात नसेल तर ती पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला दिली जाते (उदा. 29,30,31). तर 15 लाखांपर्यंतच्या ठेवींवर अकाली भरणा करण्याची परवानगी आहे. या योजनेत दंडही आकारला जाऊ शकतो. पण तो मुदत ठेवीनुसार लागू आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“महाराजांच्या घोड्यावर बसून गाढवपणा, या कृत्यानंतर मग बाबरसेना काय करणार?”

कब्बडी खेळताना, नाचताना दिसल्या प्रज्ञा सिंह ठाकूर; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल, पाहा व्हिडीओ

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! खाद्य तेलाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“महिला आयोगाला अध्यक्ष मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका”

“पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More