बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रिती सेनाॅनने ओटीटीवर रिलीज होणाऱ्या ‘मिमी’ चित्रपटातील लुक केला शेअर

मुंबई | क्रिती सॅननने नुकतच सोशल मिडीयावर तिच्या नवीन मिनी चित्रपटामधील लुक शेअर केला आहे. यानंतर चाहत्यांनी या फोटोवर भरभरुन प्रेम दाखवलं आहे. हा फोटो बेबी बंम्पसोबत आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. क्रितीचा या आगामी सिनेमाला घेऊन तिचे चाहते फार उत्सुक आहेत.

सोशल मीडियावर क्रितीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचे फॅन्स कमेंट करत आहेत. विशेष म्हणजे शेअर केल्यानंतर ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की, अडीच लाखाहून अधिक लोकांनी ही पोस्टला वाचली असून लाईक्स आणि कमेंट्स करत पसंती दिली आहे.

सिनेमात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. एका छोट्याशा खेड्यातली मुलगी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहते असते. मात्र यादरम्यान ती एका कपलला भेटते आणि सरोगेट आई बनण्याचा निर्णय घेते.

दरम्यान, विशेष म्हणजे या सिनेमासाठी क्रितीने बरीच मेहनत घेतली आहे. क्रितीने भूमिकेसाठी आपले वजनही वाढवले ​​होते. मिमीसाठी क्रितीने तब्बल 15 किलो वजन वाढवले होते. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकर दिसणार आहे.पंकज त्रिपाठी मिमीमध्ये क्रितीसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

थोडक्यात बातम्या-

“तुम्हाला कोणी सांगितलं मुंडे भगिनी नाराज आहेत? उगाच काहीही बदनामी करु नका”

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहित होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं”

शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही – नारायण राणे

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्मिला मातोंडकर भडकल्या

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More