बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुजरात सरकार आकडे लपवतंय?, 71 दिवसात बनले 1 लाख 23 हजार मृत्यू प्रमाणपत्र

गांधीनगर | गुजरातमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. तसेच मृतांची संख्या वाढली असताना सरकारी खात्यांनी दिलेल्या आकडेवारीने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यानंतर गुजरातमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या लपवली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

एका रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये गेल्या 71 दिवसात तब्बल 1.23 लाख मृत्यू दाखले अर्थात डेथ सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 4218 इतकीच दाखवण्यात आली आहे.

गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेले मृत्यू आणि जारी करण्यात आलेले डेथ सर्टिफिकेटचे आकडे यांच्याशी तुलना करता, जे ताजे आकडे समोर आले आहेत ते दुप्पट आहेत. गुजरातमधील वृत्तपत्र दैनिक भास्करने 1 मार्च 2021 पासून 10 मे 2021 पर्यंतच्या मृत्यू दाखल्यांवरुन एक वृत्त छापलं आहे. त्यानुसार, गुजरातमधील 33 जिल्हे आणि 8 महानगरांमध्ये 71 दिवसात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात एकूण 26 हजार 026 इतके मृत्यू दाखले जारी करण्यात आले. एप्रिलमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 57,796 वर पोहोचली. तर मे महिन्याच्या 10 दिवसातील आकडा 40,051 इतका आहे.

दरम्यान, मृतांचे आकडे लपविण्याचा आरोपांवर बोलताना सरकार आकडे लपवत नाही तर अन्य व्याधींनी झालेल्या मृतांची नोंद कोरोनामध्ये समाविष्ट केली जात नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

धोका वाढला! अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू

‘राजा कायम पण…’; पाहा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

‘या’ भाजप नेत्याचं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केलं तोंडभरून कौतुक

‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

तौत्के चक्रीवादाळाचं संकट; NRDF च्या 10 टीम्स ‘या’ भागात तैनात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More