सावधान!!! पुण्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; आजची आकडेवारी धक्कादायक
पुणे | पुण्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं प्रशासनाच्या अडचणीत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. काल एकाच दिवसात तब्बल 4 हजारांहुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत चालल्याचं दिसून येत आहे. प्रशासनातर्फे वारंवार आवाहन करूनही नागरिक निष्काळजीपणे वागत असल्याने हा आकडा वाढत असल्याचं सांगितलं जातंय.
याच पार्श्वभुमीवर पुण्यातील मायक्रो कंन्टेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसुन आलं. पुणे हा कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला असताना आता शहरातील मायक्रो कंन्टेन्मेंट झोनची संख्या 200 च्या पुढे गेल्याने ही आणखी चिंतेत भर घालणारी गोष्ट म्हणावी लागेल. शहरात काही प्रमाणात निर्बँध लावुनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने आता पुणे लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर आल्याचं दिसुन येत आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील एकुण 78 इमारती आणि 95 सोसायट्यांचा कंन्टेंन्मेंट झोनमध्ये समावेश झालेला आहे. त्यातील नगर रस्ता व धनकवडी हा भाग कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला असून त्या भागात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळुन येत असताना पाहायला मिळत आहे.
पुण्यातील नगर रस्ता परिसरात एकुण 39 कंन्टेन्मेंट झोन असून धनकवडी परिसरात 27 कंन्टेन्मेंट झोनची निर्मिती करण्यात आली आहे, तरीही नागरिक बेफिकरीने वागत असल्याचं चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. मागच्या एका महीन्यात कोरोना कंन्टेन्मेंट झोनची संख्या 60 वरून आता थेट 200 च्या पुढे गेल्याने याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचं दिसून येत आहे.
थोडक्यात बातम्या –
नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत डान्स, पाहा व्हिडीओ
एकाच षटकात हार्दिक पांड्याने मारले तीन गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ
अखेर 6 दिवस अडकलेलं महाकाय जहाज सुटलं; ‘इतक्या’ हजार कोटींचं नुकसान
‘मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं अन्…’; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
“सपासप कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.