बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लिंबू पाणी जितकं प्रभावी तितकंच घातकही, उद्भवू शकतात ‘हे’ सहा आजार

मुंबई | बऱ्याच लोकांना लिंबू पाणी (Lemon Water) पिण्याची किंवा लिंबू सरबत (Lemon Juice) पिण्याची सवय आणि आवड असते. परंतु पोटदुखी आणि मळमळवर जसे लिंबू पाणी प्रभावी असते तसेच ते घातक ही असते. लिंबू पाणी पिल्याने तुम्हाला सहा प्रकारचे विकार होऊ शकतात. तेव्हा वाचून विचार करुनच लिंबू पाणी प्या.

लिंबू पाणी जास्त पिल्याने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. तसेच लिंबू पाण्याच्या अतिरिक्त सेवनामुळे आपल्या शरीरात सिट्रस अॅसिडचे प्रमाण वाढून छातीत दुखू आणि जळजळू लागते. लिंबू पाणी जास्त प्रमाणात घेतल्याने आपल्या पोटात गॅस होऊन आपली पचन क्रिया मंदावून कमजोर होऊ शकते.

जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात लिंबू पाणी घेत असाल तर तुमचा त्रास वाढून आणखी डोकेदुखी होऊ शकते. लिंबू पाणी जास्त प्रमाणात घेतल्याने हाडे कमजोर होत जातात. लिंबात आम्ल पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे लिंबाचे अतिसेवन केल्याने आपले दात कमजोर होत जातात आणि दातांना सनसन जाणवू लागते.

दरम्यान, जर आपण नियमित आणि प्रमाणात लिंबू पाण्याचे किंवा जेवणासोबत लिंबाचे सेवन केले तर त्याची दाहकता कमी असते. परंतू प्रमाणाबाहेर लिंबू सेवन आपल्याला भविष्यात घातक ठरु शकते.

थोडक्यात बातम्या –

‘ही भूमिका अनाकलनीय’, शिवसेनेनं मुर्मूंना पाठींबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं ट्विट

संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले…

ईडी ना काडी, ‘या’ कारणामुळे शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

‘…त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही’, इम्तियाज जलील आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More