बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्हाला नियुक्त्या द्या, आता आम्ही हताश झालोय’; MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पत्र व्हायरल

मुंबई | मराठा आरक्षणाची प्रक्रिया संपली असून कोणत्याही समाज घटकांवर अन्याय न करता आम्हाला नियुक्त्या द्या, अशी मागणी MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या नावे एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

गेली वर्षभर राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याचं कारण देत नियुक्त्या देत नव्हतं. त्यामुळे 13 टक्के म्हणजे 48 मराठा समाजातील उमेदवारांसाठी 87 टक्के इतर समाजातील उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला असून कोणत्याही घटकांवर अन्याय न होता आम्हाला लवकर नियुक्त्या देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी या पत्रातून केली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा 2019 परीक्षा 413 पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल 19 जून 2020 रोजी लागून वर्ष होत आलं तरी राज्य सरकार उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार अशा महत्वाच्या पदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती देण्याबाबत उदासीनता दाखवत आहे, असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय.

आम्ही वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला, पण शासन न्यायालयीन प्रकरण सुरु असल्याचं सांगून दखल घेत नव्हतं. पण 5 मे, 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल दिला आहे. म्हणून आता न्यायालयीन प्रक्रिया संपली आहे. एकूण 413 विद्यार्थांपैकी SEBC चे 48 म्हणजे 13 टक्के उमेदवारांसाठी इतर समाजातील 365 म्हणजे 87 टक्के पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे, असं या पत्रात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

…तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल- चंद्रकांत पाटील

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही- राहुल गांधी

शिवसेनेच्या माजी आमदाराचं बंड; पंढरपूरनंतर आता देगलूरही महाविकास आघाडीच्या हातातून जाणार का?

ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या वृद्ध महिलेनं युवकासाठी सोडला स्वतःचा बेड, म्हणाल्या….

पुण्यातील हत्येचं सत्र सुरूच; साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आईची पुण्यात हत्या

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More