Top News पुणे महाराष्ट्र

पुण्याजवळील ‘या’ भागात होणार उद्यापासून लॉकडाऊन

पुणे | सध्या कोरोनाचा फैलाव सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येचा आकडा झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी आजपासून पुढील दोन दिवस शिरुर शहरात नगर परिषद प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.

पुण्यातील शिरुर या शहरातील सर्व कुटुंबीयांची कोरोना चाचणी होणार आहे. ही चाचणी आज म्हणजेच 16 सप्टेंबर पासून पुढील दोन दिवस सूरु असणार आहे. या दरम्यान शिरुर शहरात लॉकडाऊन असल्याचे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत दहा प्रभागातील नागरीकांची तपासणी होणार आहे. या नागरीकांची तपासणी करण्यासाठी तिनशे स्वयंसेवक नेमले असून त्यांना त्या बाबतीत संपूर्ण प्रशिक्षण दिलं आहे.

दरम्यान, या तपासणी अंतर्गत ताप, ऑक्सिजन पातळी तपासली जाणार आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यास तातडीने त्या नागरिकांची अॅटिजेन टेस्ट केली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या चाचणीचा अहवाल लगेच येणार असल्याने पुढील उपाययोजना सुलभ होतील, असं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

उदयनराजेंनी पहिल्यांदाच मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत दिला हा सल्ला

“आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही…

“कोरोना तर काहीच नाही अजून 2 मोठी संकटं येणार”

“धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु”

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शंख वाजवण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदाराला कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या