मुंबई | ग्रामपंचायत निवडणुक आता काही दिवसांवर आल्या आहेत. गावच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळतो. यामध्ये घरीतील भाऊकीमध्ये भांडणं, गावतील एकी कमी होते. या गोष्टी तर असतातच पण त्यात आता आपल्यावर कोरोनाचं संकट आहे.
कोरोनाच्या संकटात निवडणुक होणार असल्याने धोकापण आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि तब्बल एक लाखाचं बक्षीस मिळवा. हा उपक्रम पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असलेल्या अभिजित पाटील यांन केली आहे.
सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष जर एकत्रित सरकार चालवत असतील तर याचा आदर्श पंढरपूर तालुक्यातील गावांनी घेऊन गावातील एकी भक्कम करीत बिन विरोध ग्रामपंचायत निवडणूक करावी असं अभिजित पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पाटलांच्या या उपक्रमाला किती प्रमाणाता प्रतिसाद मिळतो हे काही दिवसातच कळणार आहे.
थोडक्यात बातम्या-
”इतक्या’ वर्षात देश होणार टोलमुक्त’; नितीन गडकरींची घोषणा
पहिल्या टप्यातराज्यातील ‘इतक्या’ जनतेला लस देणार- आरोग्यमंत्री राजेश टोप
केंद्र सरकारने कृषी कायद्यांना तूर्त स्थगिती द्यावी! समिती स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाची तयारी
…म्हणून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल
जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकायला हवा- उद्धव ठाकरे