भाजप आमदाराच्या गुजराती बॅनर्सवर मनसेनं कोरलं ‘मराठी’!

मुंबई | भाजप आमदाराच्या गुजराती बॅनर्सवर मनसेनं स्प्रेद्वारे ‘मराठी’ लिहिलंय. 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले होते.

आमदार मंगलप्रभात लोढा आणि नगरसेविका अनुराधा पोतदार-झवेरी यांंचे हे बॅनर्स होते. मलबार हिलमधील प्रभाग क्रमांक 218 तसेच व्ही. पी. रोडवर हे बॅनर झळकत होते.

मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याठिकाणी जाऊन प्रत्येक बोर्डवर स्प्रेद्वारे मराठी लिहिलं. तसेच महाराष्ट्रात राहून मराठी न वापरण्याच्या प्रकाराबद्दल आमदार मंगलप्रभात लोढा यांचा निषेध केला.