घरभाडं थकवल्यानं मल्लिकासह तिच्या बॉयफ्रेंडची हकालपट्टी?

मुंबई | अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला घरमालकानं घरातून बाहेर काढल्याचं कळतंय. गेल्या काही महिन्यांचं भाडं थकवल्यानं त्यांची घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय.

परिसमध्ये मल्लिका तिचा बॉयफ्रेंड कायरिल ऑक्सेफॅन्ससोबत राहत असल्याचं सांगितलं जातंय. थकलेल्या भाड्याची रक्कम 64 लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर मल्लिकाने मात्र ही बातमी खोटी असल्याचं म्हटलंय. पॅरिसमध्ये माझं कुठलंही घर नाही, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर सांगा, असं मल्लिकानं म्हटलंय.