Top News मनोरंजन

“जगणं राहिलंच, निदान त्याला मरु तरी द्या”

मुंबई |  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीत नवनवे दावे समोर येत आहेत. तसंच त्यावरून बरंच राजकारण देखील पाहायला मिळत आहे. या साऱ्या प्रकारावर मराठी चित्रपट दिग्दर्शक समीर विद्वांस चांगलाच भडकला आहे. जगणं राहीलंच निदान त्याला मरू तरी द्या, अशा संतप्त भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. (Marathi Directer Sameer Vidwans Tweet On Sushant Sinh Suicide Politics)

मानसिक ताण असह्य होऊन गेला, ते राहिलं बाजूलाच. जो तो स्वत:चे तर्क वस्तूस्थिती असल्यासारखे मांडतोय. काही पार जादूटोणा पर्यंत पोहोचले. काही तर स्वत:चीच पोळी भाजून घेतायत, अशा शब्दात समीरने सुशांत प्रकरणात राजकारण करणाऱ्यांना खडसावलं आहे. (Marathi Directer Sameer Vidwans Tweet On Sushant Sinh Suicide Politics)

आपला मृत्यू काही माकडांची रसद बनेल हे त्या बिचाऱ्याला माहित नव्हतं. जगणं राहीलंच निदान त्याला मरू तरी द्या, असं सरतशेवटी समीर म्हणाला आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेक घटनांवर समीर आपली मतं रोखठोक मतं मांडत असतो. सुशांत प्रकरणात देखील परिणामांची चिंता न करता त्याने राजकारण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. (Marathi Directer Sameer Vidwans Tweet On Sushant Sinh Suicide Politics)

समीर विद्वांसने केलेल्या ट्विटमध्ये त्याने म्हटलंय, “SSR मानसिक ताण असह्य होऊन गेला, ते राहिलं बाजूलाच. जो तो स्वत:चे तर्क वस्तूस्थिती असल्यासारखे मांडतोय. काही पार जादूटोणा पर्यंत पोहोचले.काही तर स्वत:चीच पोळी भाजून घेतायत.आपला मृत्यू काही माकडांची रसद बनेल हे त्या बिचाऱ्याला माहित नव्हतं. जगणं राहीलंच निदान त्याला मरू तरी द्या” (Marathi Directer Sameer Vidwans Tweet On Sushant Sinh Suicide Politics)

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाचा धुमाकूळ… देशात गेल्या तासांत तब्बल एवढे हजार कोरोना रूग्ण

मैं हूँ ना…. चिंता करू नकोस, राज ठाकरेंचा अविनाथ जाधवांना खास निरोप

लॉकडाऊनमध्ये रॉयल एनफील्डची कमाल, ग्राहकांच्या पसंतीला बुलेटची धमाल…!

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या