देश

…म्हणून मायावतींनी अमेठी रायबरेलीची जागा लढवली नाही!

नवी दिल्ली | आम्ही देशाचे हित लक्षात घेऊन भाजप आणि आरएसएसवादी शक्तींना दुर्बल करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या दोन जागा काँग्रेसला दिल्या आहेत, असं बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी सांगितलं आहे.

रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागांवर दोन सर्वोच्च नेत्यांनी निवडणूक लढवावी. या दोन्ही जागांमध्ये त्यांनी अडकून राहू नये, असं मायावती म्हणाल्या. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीमध्ये फूट पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत मायावतींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, लोकसभेसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी 38 जागांवर आणि बहुजन समाजवादी पार्टी 37 जागांवर निवडणूक लढवत आहे.

महत्वाच्या बातम्या

-ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांनी केली 10 कोटींची मदत जाहीर

-या विदेशी लोकांनी देश लुटला; काँग्रेसचं नाव न घेता विवेक ओबेरॉयची टीका

-‘या’ कारणामुळे देशभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव

-माझ्यावर होणारे हल्ले भाजपने घडवून आणले- अरविंद केजरीवाल

-ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास टाळाटाळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या