बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | कोरोना महामरीनं संपूर्ण जगासमोर मोठं संकट उभं केलं आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर डोकेदुखी वाढवली आहे. ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग वाढत चालल्यानं नागरिकांच्या चिेंतेत भर पडली आहे. ओमिक्राॅनचा वाढता धोका पाहता काही ठिकाणी लाॅकडानही (Lockdown) जाहीर करण्यात येत आहे.

ओमिक्राॅननं आता जगाचं टेंशन वाढवलं आहे. यातच ब्रिटनमध्ये तर ओमिक्रॉनने अक्षरशः थैमान घातल्याचं चित्र आहे. या नवीन व्हायरसची लढता लढता आरोग्यमंत्र्यांनीही हात टेकले आहेत. कारण हा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे.

ओमिक्राॅमच्या वाढत्या संसर्गाविषयी ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद (UK Health Minister Sajid Javid) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओमिक्रॉनबाबत आपल्याला अद्यापही काही माहिती नाही. यावर रिअॅक्ट करण्यात आता कदाचित खूप उशीर झाला आहे. कारण प्रकरणं वेगाने वाढत आहेत, असं साजिद जाविद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा (Corona)नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) चांगलचा कहर केला आहे. जगभरातील ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

‘हा’ बहुप्रतिक्षित IPO शेअर बाजारात धडकणार; गुंणतवणूकदांरांंना मोठी संधी

इकडं सुनेची ईडीकडून चौकशी तर संसदेत सासू भाजपवर कडाडल्या

कुत्री-माकडांचं टोळीयुद्ध संपलं! दहशत माजवणारी माकडं अखेर जेरबंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More