Top News देश

देशातील कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्धवस्त झालं- राहूल गांधी

नवी दिल्ली |  देशात कोराना संसर्ग रोगाने थैमान घातलं असून देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. याच मुद्यावरुन देशातील कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्धवस्त झालं, असं म्हणत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं असून त्यात त्यांनी लिहिलं की, “देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटीवर तर जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी 21 दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र अनियोजित लॉकडाऊनमधून ते साध्य झालं नाही. पण, देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.”

गेल्या 24 तासांत देशभरामध्ये 25 हजार 153 नवे रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही 1 कोटी चार हजार 599 एवढी झाली आहे. एक कोटी कोरोनाबाधित रुग्ण असलेला भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कायमचा रोखण्यासाठी त्यावरचा उपाय सापडा आहे. कोरोनावरील लस तयार झाली असून, जानेवारी महिन्यात लसीकरण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


थोडक्यात बातम्या-

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन

आता शिक्षकांनाही कोविड उपचारावरील खर्च मिळणार!

क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या

पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा- शिवानंद तिवारी

“अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळे त्यावर त्यांनी स्वत:च लेबल लावू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या