बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्री जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल

ठाणे | गृहनिर्माण मंंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ठाण्यातल्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीटीआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

गेल्या आठवड्यात आव्हाड कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी देखील केली होती. माझी चाचणी निगेटीव्ह आली आहे, असं ट्विट करून त्यांनी संबंध महाराष्ट्राला देखील सांगितलं होतं. त्यानंतर आता जवळपास 13 दिवसांनंतर आव्हाडांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर होम क्वारंन्टाईन होण्याचा निर्णय घेतला होता. होम क्वारंटाईन असताना देखील ते ट्विटरवरून महाराष्ट्राच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, खबरदारीचा भाग म्हणून त्यांच्या काही तपासण्या करण्याकरिता त्यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. आज त्यांच्या तपासण्या होणार आहेत, अशी माहिती कळतीये.

ट्रेंडिंग बातम्या-

‘बिल्डरांनी वाट लावली, लाज वाटायला हवी’; झोपडपट्ट्यांमधील वाढत्या कोरोनामुळे रतन टाटा आक्रमक

‘परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

अबब!!! फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवले ‘एवढे’ हजार कोटी

Good News… कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्डचा दावा; या दिवशी लोकांवर केली जाणार चाचणी

असदुद्दीन ओवैसींच्या मुखी पहिल्यांदाच मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More