बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बकरी, गाय, झोपडी ही संपत्ती, रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी झाली आमदार

नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांचा आज निकाल लागला. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सर्वांचं लक्ष लागून होतं. यामध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आलं. मात्र यासोबतच पश्चिम बंगालमध्ये चंदना बावरी ही महिला आमदार झाली आहे.  या महिलेच्या नावाची चर्चा आहे कारण या आमदार बाईंचा पती हा रोज मजुरीला जातो.

बंगालमधील सलोतरा येथील एका लहानशा झोपडीत राहणाऱ्या मनरेगा श्रमिक भाजप उमेदवार चंदना बावरी यांच्याजवळन गाय, तीन बकरी, एक झोपडी अशी अवघी 32 हजार रुपयांची संपत्ती आहे. या महिलेने तृणमूल काँग्रेसच्या संतोषकुमार मंडल यांचा 4000 मतांनी पराभव केला. त्यांनी मिळवलेल्या यशाने त्यांचं देशभरातून कौतुक केलं जात आहे.

राज्यात ममता बॅनर्जींची लाट असताना चंदना बावरी या निवडून आल्या आहेत. चंदना यांचं घर साध्या विटांचं असून त्यांच्या घरी अजूनही वीज कनेक्शन नाही. सोशल माध्यमांवर चंदना यांचं जोरदार स्वागत झालं.

दरम्यान, एडीआरच्या रिपोर्टनुसार चंदना बाउरी पश्चिम बंगालमधील सर्वात गरीब उमेदवारांमधील एक आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मी जिंकू शकेल का, याबाबत भीती होती. मात्र अनेकजण पाठीशी उभं असल्याचं चंदना यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

 

 

थोडक्यात बातम्या- 

आई-पत्नीमधील सततच्या वादाला वैतागून मुलाने उचललं धक्कादायक पाऊल!

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ही लढाई अशीच सुरू राहील- राहुल गांधी

वयाच्या 25 व्या वर्षी खासदार झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचं निधन!

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More