बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तुफान हाणामारीत मनसे नेते प्रविण मर्गज जखमी

मुंबई | शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असतात. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपुर्वी मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याचा पाढा वाचला होता. त्यानंतर या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. आता याच दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराजवळ साफसफाईचं काम सुरू होतं. जोगेश्वरी पूर्वेला प्रभाग 73 मध्ये हे काम केलं जात होतं. काही वेळानंतर मनसेचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज हे कंत्राटदराला भेटण्यासाठी आले. प्रविण मर्गज यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होेते. त्याठिकाणी असलेल्या कंत्राटदाराला कामासंदर्भात मनसेने कार्यकर्त्यांनी विचारपूस केली. त्यादरम्यान त्याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे हे सुद्धा त्यांच्या साथीदारांसोबत पोहोचले.

मनसेचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्यात कंत्राटदारावरून दोन्ही पक्षामध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांवर अरेरावी केली. काही वेळातच त्याचे या शाब्दिक भांडणांचं रूपांतर मारामारीमध्ये झालं. या दोन्ही गटात झालेल्या हाणामारीत मनसेचे प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मनसेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जबर चोप दिल्याची देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान, दोन्ही गटातील मारहाणीच्या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. पोलीस मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्या आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत असल्याचं मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिपळे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा”

चंद्रपुरची दारुबंदी नेमकी का उठवली?; सरकारने दिली ‘ही’ 4 कारणे

“पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते मदत करत नसतील तर…”

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे राज ठाकरेंचंही मत- खासदार संभाजीराजे

फडणवीस सरकारचा शासन निर्णय महाविकास आघाडीने बदलला, घेतला नवा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More