Top News

राष्ट्रवादीने अमोल कोल्हे आणि उदयनराजेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Loading...

मुंबई | राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनाला शह देण्यासाठी नवीन प्लॅन आखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य’ यात्रेचं आयोजन केलं आहे.

शिवस्वराज्य यात्रेची धुरा अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहेे. तर शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले स्टार कॅम्पेनर म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.

Loading...

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मगाव असणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरीवरून 6 ऑगस्ट रोजी या यात्रेला सुरूवात होणार आहे, यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑगस्ट पासून तुळजापूरमधून चालू होईल. तर यात्रेची सांगता स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर होईल.

दरम्यान, या यात्रेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना!

-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली??? चित्रा वाघ म्हणतात…

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

Loading...

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या