Top News सिंधुदुर्ग

प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी मुहूर्त सापडला

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षीत चिपी विमानतळाचा अखेर मुहूर्त सापडलाय.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे जानेवारी 2021 पासून कार्यान्वित होणार आहे. यासंदर्भातील लेखी आश्‍वासन नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना दिलंय.

सिंधुदुर्ग विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांना विनंतीपत्र पाठवलं होतं. या पत्राद्वारे चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली होती.

हरदीप पुरी यांनी पत्राची दखल घेत सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासकार्याशी संबंधित कार्यवाहीला वेग देण्यात आल्याची माहिती प्रभूंना दिलीये.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवीन विषाणू

“कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन रद्द करणाऱ्या मोदींना कितवं आश्चर्य म्हणणार?”

पृथ्वी शॉच्या अफलातून लेग स्पिनने सर्वांना झाली शेन वॉर्नची आठवण; पाहा व्हिडीओ

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या