बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

पुण्यात आज दिवसभरात 1836 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3,318 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 72 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 24 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1381 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,56,293 इतकी आहे. तर पुण्यात 23692 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7611 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 424990 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 13908 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

पुण्यात वाढत्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलत आहे.

थोडक्यात बातम्या- 

ओव्हर एक्टिंगचे 50 कट! लस घेताना केलेल्या ड्रामामुळे मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

सकारात्मक बातमी | कॅन्सरग्रस्त 3 वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, रुग्णालयात जल्लोष, पाहा व्हिडीओ

मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सरपंच राहिलेल्या महिलेला कोणी खांदा न दिल्याने मुलाने….

चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे- अशोक चव्हाण

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More